Roha : खांब नडवली येथील अखंड हरिनामाची उद्या सांगता !

Khamb Harinam Saptah
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करत असलेल्या खांब पंचक्रोशीचा ६७ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी ६ एप्रिल रोजी काल्याच्या किर्तनाने तसेच सद्गुरू वै.स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबाकर महाराज यांच्या चरण पादुका तसेच श्रींच्या पालखी सोहल्याने होणार आहे.
सद्गुरू गुरुवर्य अलिबागकर महाराज,गुरूवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर, यांच्या कृपाशीर्वादाने हभप नारायण दादा वाजे, हभप दत्तू महाराज कोल्हटकर ( पंढरपूर ) यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड भूषण तथा खांब पंचक्रोशीचे आधिस्थान हभप मारूती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली, श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी, तसेच नडवली ग्रामस्थ यांच्या वतीने गेली सात दिवस ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री संत तुकाराम महाराज सामूहिक गाथा पारायण भजन संपुर्ण हरिपाठ प्रवचन कीर्तन हरी जागर अशा धार्मिक कार्यक्रम सप्ताह महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून याचा सांगता सोहळा शनिवारी सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत काल्याचे कीर्तन सेवेतून तसेच सायं पालखी उत्सव दिंडी मिरवणूक द्वारे करण्यात येणार आहे गेले सात दिवस भक्तांच्या उपस्थित मध्ये पारायण, कीर्तन, प्रवचन, आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात या कालावधीत मोठ्या आनंद उत्साहात संपन्न झाले.
ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे गाथा पारायणाला नडवली ग्रामस्थ मुंबईकर तसेच खांब पंचक्रोशीतील आदी भागातील वारकरी संप्रदाय मंडळी भाविक भक्त उपस्थित राहत या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद लुटत याचा लाभ घेत आहेत. नुकत्याच झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने गावात भव्य दिव्य असे शिव स्मारक उभारण्यात आले आहे.तसेच परंपरेनुसार या पंचक्रोशीत श्री संत तुकाराम महाराज बीज देखील श्री क्षेत्र खांब येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या निमित्ताने देखिल हरी भजन किर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात तर जिथे सप्ताह महोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या धर्तीवर नडवली येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करत त्याचे भव्य दिव्य असे शुशोभिकरण करण्यात आल्याने मोठे भक्तीचे स्वरूप तसेच जणू धाकटी पंढरी रूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे.
खांब पंचक्रोशीतील श्री क्षेत्र नडवली येथे मोठ्या आनंदायी वातावरणात ३० मार्च रोजी या सप्ताह सोहळ्याकचा प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने ग्रामस्थ महीला युवक मंडळ यांनी आगळ्या वेगळ्या प्रकारचे सजावटीतून देखावे सादर केले तर किर्तन रूपी सेवेत चक्क विविध संतांची वेशभूषा परिधान करून किर्तनकार यांचे जल्लोषात स्वागत करत तर सात दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांगता होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *