Raigad : जिल्ह्यातील बेरोजगार महिला व युवांकरिता रोजगार मेळाव्याचं आयोजन !

Rojgaar Melava
रायगड :
 जिल्ह्यातील सर्व बेरोजागार महिला व युवकांना आवाहन  करण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महिला व युवां करिता शुक्रवार  दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी  10.00 ते 04.00 वाजेपर्यंत काळसेकर टेक्निकल कॅम्पस, प्लॉट 2 63, सेक्टर-16, खांदागाव, ठाणे नाका जवळ, पनवेल येथे विशेष महिला व युवां करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. / एच.एस.सी , आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. तसेच दिनांक 10 व 11 जुलै या दोन दिवसामध्ये उमेदवारांसाठी सॉफ्ट स्किल, सी.व्ही. बनवणे, मुलाखतीस सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे व फिटर,वेल्डर,मेकॅनिकल,प्लंबर इ. तांत्रिक कोर्स चे रिफ्रेशमेंट प्रशिक्षण ITI पनवेल येथे देण्यात येणार आहे.
या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.
रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक 9421613757 वर  संपर्क करावा. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, सहायक आयुक्त, रायगड-अलिबाग श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *