Pen Private High School बारावी परीक्षेचा निकाल ९२.६२ टक्के, ५५६पैकी ५१५ पास

Pen Private Highschool
पेण :
पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पेण या शाळेतील एच.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी / मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत ५५६ विद्यार्थी परीक्षेस बसलेले असून ५१५ विदयार्थी उत्तीर्ण झाले असल्याने या प्रशालेचा निकाल ९२.६२टक्के लागला आहे.
शास्त्र या शाखेत २०६ विद्यार्थ्यांपैकी २०४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.०२ टक्के निकाल लागला.कला शाखेत १७६ विद्यार्थ्यांपैकी १४२ पास होऊन ८०.६८ टक्के निकाल लागला तर वाणिज्य शाखेत १७४ विद्यार्थ्यांपैकी १६९ पास होऊन ९७.१२ टक्के निकाल लागला.
बारावी परीक्षेत शास्त्र विषयात चव्हाण मयुरेश मुकेश(५३५ गुण ) ८९.९१टक्के प्रथम तर प्रजापती रोशन रामसुरत (५२५गुण)८७.५० टक्के शाह युग संजय (५१९गुण)८६.५०टक्के देव अरिन अमित (५१५गुण)८५.८३टक्के पांडे तिर्था चंद्रकांत (५०७गुण)८४.५०टक्के तर वाणिज्य शाखेत कदम कृपा संतोष (५७२गुण) ९५.३३ टक्के नवाळे हार्दीक अमित(५६३ गुण)९३.८३ टक्के लांगी मनस्वी चंद्रकांत(५६१ गुण)९३.५० टक्के भोईर मनाली मोहन(५४५ गुण)९०.८३ टक्के हडकर मंथन चंद्रहास (५३४ गुण) ८९.०० टक्के तसेच कला शाखेत सावंत रोशनी नारायण. (४५०गुण) ७५.०० टक्के पाटील तन्वी विवेक (४३८गुण)७३.०० टक्के दोरे ज्योती पांडुरंग(४१६ गुण)६९.३३ टक्के राऊत मयूर संजय(३९८ गुण)६६.३३ टक्के वारगुडे रोहित महादेव(३९० गुण)६५.०० टक्के असे गुण मिळवून शाळेचे व संस्थेचे नाव लौकीक केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड मंगेश नेने कार्याध्यक्ष प्रशांत ओक उपकार्याध्यक्ष व खजिनदार संजय कडू मानद चिटणीस सुधीर जोशी सर्व संचालक मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.

Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *