तालुक्यातील कणे गावामध्ये गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराला आग लागली व त्याचं प्रचंड नुकसान झालं होतं. या बाबतची माहिती पेण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे तरूण व उच्च शिक्षीत नेतृत्व अतुल म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट-लंडन) यांना मिळताच बेघर झालेल्या कुटूंबाचं सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावता यावा यासाठी गणेश दिनकर म्हात्रे यांची व त्यांचे कुटुंबीय गंगूंबाई गणेश म्हात्रे (पत्नी), विजय गणेश म्हात्रे (मुलगा), सुभाष गणेश म्हात्रे (मुलगा) यांची काल सायंकाळी भेट घेतली व त्यांच्या कुटूंबियांना रोख पंचविस हजार रुपयांची अल्पशी मदत देवून या कुटुबाचं सांत्वन केलं.
या वेळी अतुल म्हात्रे यांच्या सोबत कामगार पक्षाचे भास्कर पाटील, नागाजी मारुती पाटील, बळीराम पांडुरंग पाटील, अनंत बाळाराम पाटील, रविकांत पाटील, धिरजी विठोबा पाटील, महेंद्र ठाकुर, शेखर शेळके, राजेंद्र झेमसे, नरहरी पाटील, आर. के. सर, अजित पाटील आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संखेनं उपस्थित होते.
यावेळी या नुकसानग्रस्त कुटूंबाची भेट देवून त्यांचे सांत्वन करून पंचविस हजार रुपयांची मदत दिल्या बद्दल अतुल म्हात्रे यांचं कणे येथिल कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.