पेण तालुक्यातील रामवाडी परिसरातून 13 वर्षीय मुलगा हरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कु. संस्कार रामकेवाल चौधरी असे या मुलाचे नाव असून तो R.P. नगर, रामवाडी येथे राहणारा आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संस्कार हा कालपासून घराबाहेर दिसला नसून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, नातेवाईक व मित्रमंडळी शोधकार्य करीत आहेत. तरीही मुलाचा पत्ता लागत नसल्याने पेण पोलिस ठाण्याकडून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे दिसून आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल (मो. 8692999100) व PSI नवनाथ रसाळ (मो. 9975697896) यांनी केले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.