पेण शहरातून वाहणारी भोगावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या भुंडा पुलाच्या शेजारी नव्याने बांधलेल्या पुलावरून पाणी ओव्हरफ्लो होऊ लागले असून नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपरिषद तसेच ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पेण शहरासोबतच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी देखील सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या परिस्थितीत ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्कात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बचाव पथके सतत निरीक्षण ठेवून आहेत.