
रस्ते पूल व संरक्षण भिंती यांच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्नचिन्ह?
महाड ( मिलिंद माने ) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाला तडे गेल्याने व पुलाची अवस्था गंभीर असल्याने या पुलावरून जाणारी वाहतूक जुना पुलावरून चालू केली होती तसेच याबाबत मनुष्याचे कोकणचे नेते व सरचिटणीस तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशारा आणि PEN न्यूज च्या दणक्याने राष्ट्रीय महामार्ग खाते जागे झाले असून आज सकाळपासूनच ठेकेदाराच्या उपस्थितीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे गेल्याने व पूल धोकादायक स्थितीत बनल्याने रविवारी दुपारपासून या पुलावरील वाहतूक बंद करून जुन्या पुलावरून वाहतूक चालू केली होती या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष व कोकणचे नेते तसेच मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या गंभीर इशारा नंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना फुलाच्या तातडीच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत 19 जुलै रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन पावसाळ्याच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत ठेवण्याबाबत निर्देश दिले होते असे असताना दोन दिवसाचा कालावधी गेल्यानंतर रविवारी जगबुडी नदीवरील नव्या पुलाला तडे गेल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी किती जागृत आहेत याचे जिवंत उदाहरण पाहण्यास मिळाले.
खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम करून हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला मात्र ऐन पावसाळ्यात या पुलाला तडे गेल्याने त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष मनसेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पळस्पे फाटा ते महाड पर्यंत रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सर्वसामान्य नागरिकांपासून रायगड ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील . नागरिकांच्या वाहतूकदारांच्या मोठ्या तक्रारी आहेत तर या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात दिवसेंदिवस होत असताना राष्ट्रीय महामार्ग खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या महामार्गाच्या तक्रारी वाढल्याने अखेर 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष पाहणे करावी लागली व संबंधित अधिकाऱ्यांसोबत व कंत्राटदारांबरोबर पेण मध्ये मीटिंग घ्यावी लागून संबंधित कंत्राटदाराला तातडीने रस्त्यावरील खड्डे सुस्थितीत करून रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश दयावे लागले होते

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते पूल व संरक्षण भिंती यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील काँक्रिटीकरणाच्या कामापासून कशेडी घाटातील बोगदा व परशुराम घाटातील संरक्षक भिंत तसेच . सिमेंट काँक्रीटच्या बनवलेल्या रस्त्यावर गेलेले तडे यामुळे होत असलेले वारंवार अपघात व अनेक ठिकाणी रस्ता हा जंपिंग जपाक चा झालेला असल्याने या महामार्गावरील सर्वच कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याचे नाही का जर गुणवत्ता असते तर आज जागोजागी रस्त्याला तडे गेले नसते व संरक्षण भिंती खचल्या नसत्या तसेच कशेडी बोगद्यामधील गळती लागली नसती ज्या पद्धतीने घाई घाई या महामार्गावरील कामे केली गेली त्या कामांची गुणवत्ता तपासण्यात आली नाही वही कामे निकृष्ट दर्जाची असताना ते मी वारंवार सांगत होतो जगबुडी नदीवरील ज्या पुलाला तडे गेले आहेत त्याबाबत मी चार वर्षापूर्वी आवाज उठविला होता मात्र प्रशासन व पोलिसांनी माझी चुकी काढून मला दीड महिना जेलमध्ये टाकले आज पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे हे मी वारंवार सांगत होतो ते आता सिद्ध झाले आहे. असे मनसेचे सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगून मनसेच्या इशारा आणि PEN न्यूज मधील बातमीने राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकाऱ्यांना जागा आली आहे असे सांगून PEN न्यूज वृत्त वाहिनीचे आभार मानले.
जगबुडी नदीवरील नवीन पुलावर गेलेले तडे व त्यामुळे पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामाला ज्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने कोकणातील गणेशोत्सवाचा सण जवळ येत असल्याने परशुराम घाटातील संरक्षक भिंत तसेच राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी पडलेले खड्डे आहेत त्याची तातडीने दुरुस्ती चालू करा असे वैभव खेडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना इशारा बाजार सूचना देताना सांगितले.
Related