Lok Sabha Elections 2024 : पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ६०.२२ % मतदान

Voting
मुंबई :
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये शुक्रवार दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
 पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
९-रामटेक ५८.५० %,
१०-नागपूर ५३.७१ %,
११-भंडारा- गोंदिया ६४.०८ %,
१२-गडचिरोली- चिमूर ६७.१७ %
 १३- चंद्रपूर ६०.०३ %.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *