Karjat : कशेळे- खांडस रस्त्याची दैना कायमच

Road Karjat Khandas

तात्पुरती डागडुजी करूनही पुलाची अवस्था बिकट, अपघातात जीवितहानी झाल्यास जबादार कोण?

कर्जत ( गणेश पवार ) : 

 तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची दयनीय अवस्था असल्याचे वात्सव समोर येत असतानाच, त्यामध्ये आता कशेळे – खांडस, नांदगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कशेळे – अॅकेडमी जवळील व किकवी चिल्हार नदीवरील पुलाची व रस्त्याची दयनीयअवस्था संदर्भात काही दिवसा पूर्वी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील खड्डे भरूण तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.
मात्र सदर पुलाची अवस्था ही जैसेथी परस्थितीमध्ये बिकट अशी असल्याने, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, या पुलावरून प्रवास दरम्यान आपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालक व नागरिक यांच्या कडून उपस्थित केला जात आहे. नागरी समस्या सोडविण्यास कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुस्त असल्याचे व आपघातामध्ये जिवितहानी होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
कशेळे पासून खांडस, नांदगाव भागात जाणाऱ्या रस्त्यावर २५ हून अधिक गावे व आदिवासी वाड्या येथील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे. कशेळे खांडस किकवी येथील पुल असाच आहे. कशेळे ते खांडस, गावाकडे जाणार्‍या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर तसेच जोडरस्ता नांदगाव यावर शासनामार्फत लोकांच्या कर प्राप्त पैशातून सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत मागील पाच सहा वर्षात सातत्याने करोडो रुपयांचा साधारण १५ कोटीचा निधी खर्च केला आहे. तर यावर्षी कशेळे ते खांडस फाटा पर्यंत रस्ते दुरुस्ती झाले आहेत.
या रस्त्यावरील अँकडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स येथील चिल्हार नदीवरील वाहतुकीच्या दुष्टीने अत्यंत महत्वाचा असा किकवी येथील दुरावस्थेतील असलेल्या पुलाची डागडुजी च्या कामाकडे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी एकदाही निधी खर्च केलेला नसल्याने व या वर्षी डांबरी करण करण्यात आले असताना, व करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या निकृष्ठ कामाचे पितळ हे वरूणराजाने उघडे पाडल्याचे व पुलावरील डांबर हा निघून गेल्याने पडलेले मोठ मोठे खड्डे तसेच पुलाचा डांबराखालील भाग हा दिसू लागल्याने, व या खड्यांमध्ये पाणी साठत असल्यामुळे या पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणे कठीण होत असल्याने या रस्ता व पुलावरून जीव मुठीत घेऊन वाहनचालक व नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याचे तसेच दरवर्षीच्या अर्थसंकल्पात कशेळे – खांडस व नांदगाव जोड रस्त्यावर शासनाकडून निधीची तरतूद केलेली जात असताना देखील कशेळे – खांडस व नांदगाव जोड रस्त्याची व जुने असलेल्या पुलांची दयनीय अवस्था का? व दयनीय अवस्थेत असलेल्या रस्ता व पुलांवरुन प्रवास करताना एखाद्या वाहनास आपघात होऊन जीवीतहानी झाल्यास याला नेमका जबाबदार कोण? व सदर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हे आम्ही सूरू करून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करू असे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथील इंजिनियर अक्षय चौधरी यांनी बातमीदार यांना देण्यात आलेली प्रतिक्रिया या संदर्भात काही दिवसा पूर्वी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
या बातम्यांची दखल घेत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील खड्डे भरूण तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र सदर पुलाची अवस्था ही जैसेथी परस्थितीमध्ये बिकट अशी असल्याने, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, या पुलावरून प्रवास दरम्यान आपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालक व नागरिक यांच्या कडून उपस्थित केला जात आहे. तर नागरी समस्या सोडविण्यास कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुस्त असल्याचे व आपघातामध्ये जिवितहानी होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *