Flood Updates : जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात

Khed Shahar
महाड ( मिलिंद माने ) :
कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात शनिवारपासूनच पावसाने रौद्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याचे पातळ्या ओलांडल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत तर खेड शहरात सकाळपासून जगबुडी नदीचे पाणी शहरात फिरण्यास सुरुवात झाल्याने खेड मधील व्यापारी भीतीच्या सावटाखाली असल्याचे चित्र खेड शहरात पाहण्यास मिळत आहे.
कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी शनिवारपासून चालू झाली असल्याने कोकणातील सर्वच नद्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे त्यामुळे अनेक मार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठेमध्ये आपले सामान वाचवण्यासाठी नागरिकांची व व्यापाऱ्यांची धावपळ चालू आहे तशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात झाली असून खेड शहरातील जगबुडी नदीने शहरातील बाजारपेठेत प्रवेश केला असून बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिक आपापले सामान वाचवण्यासाठी जीवाची परिक्रष्टा करीत आहेत तर शहरातील मच्छी मटन मार्केट पासून जगबुडी नदीच्या पाण्याचा प्रवाह शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरला असल्याने व्यापाऱ्यांनी देखील आपले सामान हलवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ चालू केली आहे.
जगबुडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगराध्यक्ष व कोकणचे मनसे नेते वैभव खेडेकर हे संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून पुराचे पाणी शहरात घुसून हाकार होऊ नये यासाठी त्यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *