Alibag : उद्या नामदेवनगर येथे श्रीराम जन्मोत्सवाचं आयोजन

Shreeram
अलिबाग :
नामदेवनगर येथील र्कै. सिताराम त्र्यंबक पाटील कुटुंबीयांकडे बुधवार दि.१७/४/२०२४ चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 या उत्सवाचे यंदाचे हे ६५ वे वर्षे आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 1:00 पर्यन्त -श्रीराम जन्म सोहळा, दु.1 : 00 ते 02 : 30- महाप्रसाद,  दु. 02: 30 ते सा. 04 : 00 पर्यन्त  डोंबिवली येथील सुप्रसिद्ध ह.भ. प. श्री. दत्तात्रय परब महाराज यांचे “सुखी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर प्रवचन होणार आहे तरी सर्व भक्त गणांनी याचा लाभ घ्यावा असे पाटील कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *