जिल्ह्यातील सर्व व बेरोजगार उमेदवारांना विनंती करण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व रोहा इंडस्ट्रीज आसोसिएशन,धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता दिनांक 28 जानेवारी,2025 मंगळवार रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत रोहा इंडस्ट्रीजअसोसिएशन, प्लॉट नं.6, एम.आय.डी.सी. धाटाव. ता.रोहा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित केला आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी , आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. व तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये इंटर्शिपला अप्लाय करणेसाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिक करुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहीती अद्ययावत करुन Apply for Jobs ला क्लिक करुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्त पदांना Apply करावा.
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड – अलिबागच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141- 222029 किंवा श्री. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या दुरध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.