एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे कायदेशीर रखवालीतून फूस लावून अपनयन केल्याची घटना घडल्याने तिचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
कु.राजश्री सुरेश नाईक (17 वर्ष 4 महिने, रा.शिरढोण) असे या तरुणीचे नाव असून तिला अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून अपनयन केल्याची घटना घडली आहे.
सदर तरुणीचा रंग सावळा, चेहरा गोल, बांधा सडपातळ, केस लांब, नाक सरळ, अंगात पंजाबी ड्रेस सफेद रंगाचा त्यावर लाल रंगाची फुले असलेला, पायात तपकिरी रंगाची सँडल घातलेली असून तिला मराठी, हिंदी आणि कातकरी भाषा बोलता येते.
सदर तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 02227452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण मो.9823193888 यांच्याशी संपर्क साधावा.