२३ वी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : रायगड संघाचा विजेतेपद मिळवून थरारक विजय

२३ वी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: रायगड संघाचा विजेतेपद मिळवून थरारक विजय

रायगड :

नंदुरबार येथे आयोजित २३ व्या राज्यस्तरीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड संघाने धुळे संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. धुळे संघाने ५ ओव्हरमध्ये ५० धावांचे आव्हान दिले होते, ज्याचे रायगडने दोन ओव्हर राखून यशस्वीपणे पाठलाग केला.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. रायगडच्या विजयी खेळाडूंमध्ये राज बामुगडे, कुणाल पाटील , ऋग्वेद मोरे, संस्कार देशमुख, कुणाल पाटील, हार्दिक म्हात्रे, आयुष दिघे,सुयश वाघमारे, विघ्नेश थिटे, विराज म्हात्रे, आयुष मनवे, पार्थ कोळी, अश्मन महेंद्र म्हात्रे,  सिद्धांत गुरव आदींचा समावेश होता.
बक्षीस वितरण समारंभात राज्य संघटनेचे सचिव डॉ. मोहमद बाबर आणि इतर मान्यवरांनी विजेत्यांचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *