२०१३ कायद्याने पुनर्वसन व्हावे यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Aandolan
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
गोवर्धन राजाराम पाटील वय – ६० वर्षे,धनाजी राजाराम पाटील वय-६३ वर्षे, भिमाबाई कृष्णा पाटील वय-७२ वर्षे,संतोष कृष्णा पाटील वय-५२ वर्षे, संजय कृष्णा पाटील वय-५० वर्षे,शेखर कृष्णा पाटील वय-४८ वर्षे हे सर्व शेतकरी मु. चिर्ले, पो. जासई, ता. उरण, जि. रायगड येथील रहिवाशी आहेत.
सदर सर्व अर्जदार शेतकरी ताबे , कब्जा, वहिवाट,मालकीने, कसत असलेल्या शेतजमिनीचा सर्व्हे नंबर ५९-ब , क्षेत्र-१२ गुंठे मौजे-जांभुळपाडा, ता. उरण, जि. रायगड ही जमिन विरार अलिबाग कॅरिडॉर प्रकल्पामध्ये बाधित होत असून त्यांचे पुनर्वसन भूसंपादन कायदा २०१३ नुसार करण्यात यावे.
जमिनीस बाजारभाव प्रतिगुंठा ५ कोटी रूपये मिळावा. त्याप्रमाणे त्यांच्या कॅन्टीनचे (हॉटेल) व्यावसायिक पुनर्वसन व्हावे, सरकारी नोकऱ्या, प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे. विकास कामात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के विकास कामे मिळावीत. अशा विविध मागण्या सदर शेतकऱ्यांचे असून या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास सदर सर्व शेतकरी गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रो सेंटर कार्यालय पनवेल येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *