महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक रायगडच्या भूमीत त्यांच्याच आचार विचाराने प्रेरित होऊन स्वराज्य सेवा फाउंडेशन कोलाड या संस्थेच्या माध्यमातून”अंध:काराकडून प्रकाशाकडे”या उक्तीप्रमाणे मागील चार वर्षापासून दिवाळी उत्सवकाळात एक नावीन्यपूर्ण उपक्रम आदिवासी वाडी वस्तीवर जाऊन साजरा करण्यात येतो.या लोकांमध्ये दीपावलीचा उत्सव आनंदाने लहान थोर एकत्रित करून साजरी केली जाते. याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोलाड विभागातील स्वराज्य सेवा फाउंडेशनचे प्रमुख नीरज राजेश कदम आणि त्यांचे मित्र परिवार हे दिवाळी उत्सव म्हणून खेड्यापाड्यातील आदिवासी वाडी वस्तीवर जाऊन त्यांच्या मिसळून येथील लोकांना त्यांच्या मुलांना दिवाळी उत्सवाचा आनंद देत मोठ्या उत्साहात साजरा करतात.
सलाहाबाद प्रमाणे याहीवर्षी माणगाव तालुक्यातील निलगुण या आदिवासी वाडीवर दिवाळी उत्सव साजरा केला यावेळी वाडीवर जाऊन साफ सफाई, तेथे दिवाळी उत्सव म्हणून कणा रांगोळी, दीप लावणे,विविध रंगी बेरंगी कंदील लाऊन सजावटी करणे दिवाळी निमित्ताने फराळ वाटप करणे तसेच तेथील लहान मुलांसोबत विविध प्रकारचे फटाके वाजून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून देत की ज्यांना आनंद म्हणजे काय हेच माहीत नाही आनंद कसा साजरा करायचा आपल्या माणसात तो कसा मिळवायचा आणि त्या मिळालेल्या आनंदात आपला संसार कसा फुलवायचा कसा सजवायचा आपल्या लेकरा बाळांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे कसे घेऊन जायचे त्यांचे आयुष्य हे नेहमीच संघर्ष, हाल अपेष्टा ,पराकोटीचे दुःख, अज्ञान, अशिक्षित पणाने खच्चून भरलेलं आहे आपण कधी एखादा सण उत्सव साजरा करून त्याच्यातून आनंद कसा मिळवायचा हे त्यांना माहीतच नसतं अशाच लोकांच्या डोळ्यातील आनंदाश्रुत सुशिक्षित होतकरू युवा तरुण तसेच स्वराज्य सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष नीरज कदम आणि त्यांची संस्थेचे सर्व पाधिकारी हे कार्य मोठ्या उत्साहात दिवाळी उत्सव आदिवासी वाडीवर जाऊन त्यांच्या घरात दिवाळीचा दिवा लावून त्यांना प्रकाशाचा सूर्य दाखवत रंगीबिरंगी फुलांची उधळण करून संपूर्ण गावात रांगोळी काढून फटाक्याच्या आतिषबाजीने सारा आसमंत उजळून जातो सारी वस्ती प्रकाशमय करत विविध प्रकारच्या खेळाने त्यांना सारी दुःख विसरायला लावून जीवन हे खूप सुंदर आहे याची जाणीव करून देत त्यांच्याच समावेत दिवाळी उत्सवाचा आनंद लुटतात.
नीरज राजेश कदम स्वराज सेवा फाउंडेशन कोलाड आणि त्यांना मदत करणारे दाते यांच्या माध्यमातून एक जनसेवेचा हा दिवाळी उत्सव उपक्रम राबविण्यात येतो. प्रसंगी यावेळी कोलाड विभागीय कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेश कदम, संस्थेचे पदाधिकारी प्रवीण मोरे, रजत कदम, रोहन ढोकरे, कुणाल बाकाडे, सचिन दोदामणी, हर्ष जुईकर, अभिषेक शेडगे, सुयोग कदम, सुशील शिंदे, रोशन वाकळे, चेतन वाकळे, पुरुषात्तोम मासुक, संजय सानप,अजय सानपसह मित्र परिवार उपस्थित होते.
————————————–
दिपावली म्हणून त्यांच्यासोबत बसून सार्वजनिक जीवनाचा आस्वाद घेत माणूस म्हणून जगण्याची दिशा दाखवतो मात्र काही क्षण त्यांच्यासमवेत आनंदाने साजरा करतो तद्नंतर पुन्हा माघारी निघून येताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आम्हीही भावूक मनाने परतीच्या प्रवासाला लागतो अशी आमची दिवाळी साजरी होताना असे वाटते की साक्षात परमेश्वराचीच भेट झाली. त्यांच्या आनंदात आम्हाला मिळणारे समाधान हे कित्येक पराकोटीचे असते हा उपक्रम आम्ही यशस्वीपणे राबवतो तो आम्हाला मिळालेल्या सर्व देणगीदार मित्रांच्या सहकार्याने असं म्हणतात सेवेची पुण्याई ही खूप मोठी असते अशीच पुण्याई तुम्हाला मिळावी हीच ईश्वर कडे प्रार्थना या उपक्रमाची व्याप्ती आम्हाला सतत वाढवायची आहे.तरी यासाठी सहकार्याची नेहमीच अपेक्षा आहे. स्वराज्य सेवा फाउंडेशनच्या वतीने देणगीदारांचे मनस्वी ऋण अध्यक्ष नीरज कदम यांनी व्यक्त करत सांगितले .