सोनगाव येथे विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताह !

Maharaj
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीचा विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताह यजमान सोनगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून या सप्ताहाला १३ एप्रिल पासून प्रारंभ होत असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे.
शनिवार १३ एप्रिल ते शनिवार २० एप्रिल २०२४ या कालावधीत विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त सोनगाव ग्रामस्थ महीला मंडळ तसेच युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान स्वा. सु. गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरूवर्य गोपा महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोलाटकर यांच्या कृपार्शिर्वादाने व ह.भ.प. गुरुवर्य नारायण महाराज अलिबागकर (वाजे) मठाधिपती पंढरपूर, हभप वै.गुरूवर्य सखाराम महाराज निकम,ह.भ.प.रायगड भूषण गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हभप रघुनाथ महाराज भोकटे, तसेच ह.भ.प. मारुती महाराज साळवी यांच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली साजरा होत असलेल्या या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ९ ते १२ व दु. २ ते ४ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, सायं. ४ ते ५ प्रवचन, ५.३० ते ७ हरिपाठ, ७ ते ९ यावेत हरिकीर्तन व महाप्रसाद तद्नंतर जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमाने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
धार्मिक तथा आध्यात्मिक विचारांचा वारसा लाभलेल्या धामणसई पंचक्रोशीतील श्री क्षेत्र सोनगाव येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर श्री क्षेत्र पंढरपुर, चणेरा, सातारा, पनवेल, धाटाव, नाशिक, डोंबिवली, रोहा असे महराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची किर्तने व प्रवचने सेवा तसेच मौलिक मार्गदर्शन भाविकांना लाभणार आहे.तसेच या आनंददायी सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच युवक मंडळ सोनगांव (धामणसई ) पंचक्रोशी यांनी केले असून या सप्ताहाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ सोनगाव अधिक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *