सोगाव येथिल विविध विकासकामांचं मोठ्या दिमाखात भूमिपूजन!

Sogav Bhumipujan
अलिबाग/सोगांव (अब्दुल सोगावकर ) :
ग्रुप ग्रामपंचायत मापगाव तर्फे रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्याहस्ते सोगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या सोबत माजी सदस्य चंद्रकांत खोत, माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक उपाध्यक्ष लाईक कप्तान, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, रईसभाई खान, सुचित थळे, जमातुल मुस्लिमीन सोगाव अध्यक्ष मुरतुजा कूर, उपाध्यक्ष नजीर कूर, सेक्रेटरी मुफ्ती आकिब कूर, खजिनदार जलील पठाण, हशमत कूर, सिराज खान, तस्लीम कूर, दिलीप मोंढे, सुरेश राऊत, परेश सुर्वे, अक्षय जाधव, प्रतीक पाटील, अकबर पठाण, मोअज्जम पठाण, रुस्तुम कूर, सिकंदर शेख, अझीझ कूर, शोएब वाकनीस, अदनान वाकनिस, तौसिफ़ कप्तान, मुनावर कूर, शबाब खान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोगाव कब्रस्तान येथील संरक्षण भिंत बांधणे, कब्रस्तानकडे अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावर प्लेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच मजीद खान यांच्या घराजवळच्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *