रायगड जिल्ह्यात भात व नाचणी पिके अधिसूचित असून या योजनेत सहभागाची अंतिम मुदत दि.31 जुलै 2025 अशी निश्चित करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि. 14 ऑगस्ट 2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि. 30 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
राज्यात उत्पादनावर आधारित पीक विमा योजना खरीप 2025 व रब्बी 2025-26 या एक वर्षाकरिता अधिसुचित यंत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी 45.7.50 रु. व नाचणी पिकासाठी 100 रु. इतका विमा रायगड जिल्ह्यासाठी आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, अधिसूचित पिकाचे पेरणी केलेले स्वंयघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करार नामा, संमती पत्र, बँक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.