सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला मुंबई गोवा महामार्गचा आढावा

Ravindra Chavhan

रायगड  :

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पॅकेज १ ते पॅकेज १० च्या सद्य कामाची स्थिती व प्रगतीचा आढावा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.
ऐन पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या टीमने पावसाळ्यात २४ x ७ दक्ष रहावे, असे निर्देश या वेळी उपस्थितांना दिले.
मुसळधार पावसामुळे या महामार्गावर जे खड्डे पडले असतील, ते तातडीने बुजविण्यात यावेत व वाहनचालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचनाही दिल्या.
या बैठकीप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *