सलग 15 व्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम; श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालयाचा 10वी परीक्षेत उज्ज्वल यश

पेण : 
फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेत पेण शिक्षण महिला समितीच्या पेण शिक्षण महिला समिती अंतर्गत कार्यरत श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाने सलग 15 व्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
या परीक्षेत
➡️ नेहा मनोज म्हात्रे व चि. कार्तिक राजेंद्र जाधव यांनी प्रत्येकी 96.00 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.
➡️ हर्ष जितेंद्र म्हात्रे याने 94.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला,
➡️ लिखित गुरुनाथ पाटील याने 93.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच विद्यालयातील 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संदिप भोर, प्रशासन अधिकारी आर. आर. पाटील, पर्यवेक्षक सतीश पाटील, वर्गशिक्षक मिलन मोकल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.