
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : रायगड जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होवून ती अंतिम टप्प्यात आली असताना माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेवर नगरपालिका हद्दीतील श्रीबाग येथे एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माहिती घेणाऱ्या महिला शिक्षिकेने कसाबसा आपला जीव वाचवला आहे. या घटनेने माहिती घेणाऱ्या महिला शिक्षक हे आपल्या सोबत पती, शाळेतील शिपाई अथवा मुलास सोबत नेत आहेत.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सव्र्व्हेक्षण सुरु झाले आहे सर्व्हेक्षणासाठी रायगडजिल्ह्यातील ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. एकीकडे पटसंख्या कमी असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यात शाळेतील शिक्षक सर्वेक्षणात गुंतल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांवरच सर्व्हेक्षण करण्याचे काम पडल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यापूर्वी प्रशिक्षणासाठी शिक्षकांना जावे लागत होते, आता सर्व्हेक्षणामुळे शिक्षक शाळेबाहेर पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती वाढली आहे.
शिक्षकांना सव्र्व्हेक्षणाचे काम दिले गेले आहे. सर्व्हेक्षणामध्ये तब्बल १५४ प्रश्नांचा समावेश आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची वैयक्तिक माहिती भरावी लागत आहे. ४० पानांची हो प्रश्नावली असल्याने सर्व माहिती अॅपवर भरण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. ग्रामीण ी भागात वाडी-वस्त्यांवर चालत जात . अर्ज भरताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होत आहे.
सव्र्व्हेक्षणाचे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित – असल्याने प्रत्येक शिक्षकाकडे दीडशे कुटुंबाचे सव्र्व्हेक्षण आहे. एका सव्हें क्षणासाठी ४५ मिनिटांपेक्षा जास्त – कालावधी जात असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये सव्र्व्हेक्षण पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे उभे आहे. शिक्षकांना शाळेतील शाळेतील कामे आटपून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचे काम असल्याने पुरते मेटाकुटीला भरावी आले आहेत.
नेटवर्कचा अडचण ग्रामीण भागामध्ये सव्र्व्हेक्षण केल्यानंतर प्रत्यक्षात माहिती अर्ज भरताना नेटवर्क समस्या तसेच सर्व्हर डाऊन होण्याची समस्या शिक्षकांना भेडसावत आहे. त्यामुळे सव्र्व्हेक्षणाचा कालावधी वाढत असून नेटवर्क नसल्याने ओटीपी मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत.
शिक्षक वर्ग सर्व्हेक्षणासाठी बाहेर पडल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. इतर कर्मचारी तसेच सुशिक्षित बेरोजगार या कामासाठी वापरले गेले असते तर शिक्षकांवरील ओझे कमी झाले असते. गावातील शिक्षक शाळेत नसल्याची ओरड पालकांमधून आली नसती अशी चर्चा पालक वर्गात सुरु आहे.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होवून ती अंतिम टप्प्यात आली असताना माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेवर नगरपालिका हद्दीतील श्रीबाग येथे एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा माहितीला अलिबाग नगर परिषद कडून दुजोरा देण्यात आला आहे.