कर्जत ( गणेश पवार ) : कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मागील काळात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. तर येथील नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुवीचा मिळायला हव्यात यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो. अशात येथील नागरिकांच्या मुलांना येथेच ऊत्तम शिक्षण व नागरिकांना आरोग्य मिळावे म्हणून सरपंच म्हणून मी व सर्व ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. अभुदय शाळेमुळे मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल त्याचप्रमाणे येथे सुसज्ज रुग्णालय होण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी केले आहे. धामोते येथे अभुदय शाळेच्या भूमिपूजनावेळी विरले बोलत होते.
नेरळ शहराजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथे अभुदय आंतरराष्ट्रीय शाळा नव्याने निर्माण होत आहे. या शाळेचे भूमिपूजन आज दिनांक ३० जानेवारी रोजी धामोते येथे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्या हस्ते करण्यात आले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. मात्र सुसज्ज शाळा ग्रामपंचायत हद्दीत नाही. त्यामुळेच सरपंच महेश विरले यांनी या भागाच्या विकासासाठी शाळेचे नियोजन केले होते. तर आगामी काळात याठिकाणी सुसज्ज रुग्णालय देखील उभे करण्याचा मानस सरपंच विरले यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम प्रायटनशील असल्याचे शाळेच्या सहसंस्थापक ज्योत्सना विरले यांनी सांगितले आहे.
यावेळी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्यासह जिंजल शाळेच्या संस्थापक पूनम पांडे, सहसंस्थापक ज्योत्सना विरले, ग्रामपंचायत उपसरपंच साक्षी विरले, सदस्य अस्मिता विरले, नूतन पेरणे, रोशन म्हसकर, तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले, सामाजिक कार्यकर्ते राहुल हजारे, भरत पेरणे, मयूर पेरणे आदीसंह मोठ्या पालक यावेळी उपस्थित होते.