सरकारी कंपनीमध्ये 300 जागांसाठी पदभरती; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Jobs New India Ins
PEN न्यूज ऑनलाइन टीम : पदवीधर उमेदवारांसाठी द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ‘सहायक’ (असिस्टंट) पदासाठी एकूण ३००जागांसाठी भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
 पदाचे नाव :-  सहायक (असिस्टंट)
 पदसंख्या :- ३०० जागा
 शैक्षणिक पात्रता :-
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी किंवा शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच तुम्ही ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज कराल, त्यासंबंधित राजाच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 वयोमर्यादा :-
उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षे असावे.
 अधिकृत वेबसाइट:-
https://www.newindia.co.in/
 पगार :-
सहायक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला ३७,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे.
तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. अर्जातील नियम आणि अटी वाचल्यानंतरच ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइनव्यतिरिक्त इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *