सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या संरक्षक . भिंतीच्या कामामुळे एका महिलेच्या घराला धोका होऊन जीवित हानी घडण्याची शक्यता असल्याची तक्रार दिल्यानंतर ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाडचा कारभार आंधळते कुत्र पीठ खाते असा झाला आहे
महाड तालुक्यातील वराठी बौद्धवाडी येथे 2022 -23 या आर्थिक वर्षात दहा लक्ष रुपये खर्चून संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. याबाबत वराठी गावातील वैशाली प्रवीण लोखंडे या महिलेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्याकडे याबाबत रीतसर लेखी तक्रार केली असून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थिती मध्ये ठेवले आहे तक्रारदार महिलेचे घर डोंगराच्या बाजूला असून पावसाच्या अतिप्रवाहामुळे डोंगरातील माती व पाण्याचा प्रचंड प्रवाह मुळे या महिलेचे घर जमीन दोस्त होण्याची शक्यता आहे.
याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाडच्या उप अभियंत्यांना ,शाखा अभियंत्यांना व ठेकेदारांना सांगून देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याची तक्रार वराठी गावच्या वैशाली लोखंडे या महिलेने केली आहे.
महाडचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना दिलेल्या लेखी तक्रारीत या संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे माझ्या घराला व कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित खाते व ठेकेदार जबाबदार असतील असे लेखी तक्रार देऊन आठ दिवसाचा कालावधी होऊन गेला मात्र महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता झोपी गेलेले सार्वजनिक बांधकाम विभाग महाड जागे होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ठेकेदारावर मेहरबान सार्वजनिक बांधकाम विभाग?
महाड तालुक्यातील वराठी बौद्धवाडी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अरफत अख्तर लंबाडे या ठेकेदाराने काम केले असून या ठेकेदारावर महार सार्वजनिक बांधकाम विभाग फिदा झाले असून त्याने कितीही निकृष्ट दर्जाची कामे केली व मनमानी पद्धतीने कामे केली तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभाग महाड दाखवणार नाही अशी चर्चा महाड सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कर्मचाऱ्यांकडून ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे आंधळं दळतय कुत्र पीठ खाते असा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा झाला आहे