संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा: 13 हजारावर काम करणारा मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक, 21 कोटींचा घोटाळा उघडकीस

Fraud
मुंबई : 
संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून अटक केली. 11 दिवसांपासून फरार असलेल्या क्षीरसागरने 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला असल्याचे उघड झाले आहे.
हर्षकुमार क्षीरसागर हा क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होता. 13 हजार पगारावर असतानाही त्याने बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधींची संपत्ती जमा केली. त्याने क्रीडा संकुलाच्या खात्यातील कोट्यवधी रुपये स्वतःच्या खात्यांवर वळते करून अनेक ठिकाणी गुंतवणूक केली.
हर्षकुमारकडे सापडलेली संपत्ती:
1.35 कोटींची BMW कार
40 लाखांच्या 2 स्कोडा कार
32 लाखांची BMW बाईक
बँक खात्यात 3 कोटी रुपये
चीनमधून 50 लाखांची खरेदी
वडिलांच्या नावावर 1.20 कोटींचे 4 फ्लॅट
मैत्रिण अर्पिता वाडकरकडे सापडलेली संपत्ती:
1.35 कोटींचा फ्लॅट (संभाजीनगर)
1.05 कोटींचा फ्लॅट (मुंबई)
1.44 लाखांचा iPhone
15 लाखांची स्कोडा गाडी
3 बँक खात्यांत 1 कोटी 1 लाख रुपये
पोलिसांनी हर्षकुमारच्या आई-वडिलांनाही कर्नाटकच्या मुरुडेश्वरमधून ताब्यात घेतले असून, या घोटाळ्याचा तपास सुरु आहे. हर्षकुमारच्या अटकेनंतर आणखी मोठ्या खुलाशांची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *