नागोठणे ( महेंद्र माने ) : प्रतिबिंब फोटो स्टूडियोचे मालक तसेच लायन्स क्लबचे सेक्रेटरी विवेक सुभेकर यांच्या पत्नी अनिसचे नागोठणे महिला विभाग सचिव,लायन्स क्लब सदस्या तसेच समाज कार्याची आवड असलेल्या श्र्वेता विवेक सुभेकर यांचे वयाच्या 54 व्या वर्षी अल्पशा आजाराने नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात बुधवार 03 जानेवारी रोजी दुपारी 01.00 वा. च्या दरम्यान निधन झाले.
मृत्यू पश्चात श्वेता सुभेकर यांचे नेत्र दान करण्यात आले. अतिशय प्रेमल व मनमिळावू स्वभावाच्या श्र्वेता सुभेकर यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात विवेक सुभेकर हे पती,पृथ्वी हा मुलगा व सलोनी ही मुलगी असा परिवार आहे.