श्रुती शाम म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड; पक्षात आनंदाचं वातावरण

Shruti mhatre
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. श्रुती म्हात्रे यांनी आजपर्यंत पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत वरिष्ठ पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या निवडीनंतर पक्षात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.
या निवडीबाबत संवाद साधताना श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, “पक्षाच्या कामाची दखल घेऊन ही जबाबदारी मिळाली आहे. ही पदाची निवड ही केवळ माझी नाही, तर माझ्या वडिलांच्या विचारांची आणि संस्कारांची पावती आहे. काँग्रेसने खऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली याचा मला अभिमान आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मी ही जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.”
श्रुती म्हात्रे यांच्यातील नेतृत्वगुण, जनसंपर्क, समाजहिताची जाण, आक्रमक लढाऊ बाणा, वक्तृत्व आणि संघटन कौशल्य हे पक्षासाठी अमूल्य ठरणार आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असे मत पक्षातील वरिष्ठ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *