श्री. शंकरराव गोपाळराव महाडिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Mahadik School Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : येथील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाडिक अध्यक्षपदी होत्या. प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल चार्टर्ड अकाउंटंट सचिन गुजर व राजश्री गुजर संस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव महाडिक मनोज महाडिक, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, केंद्रप्रमुख शिवाजी महाडिक, डॉ. अनिल काकड, मंगेश चिले, परशुराम दरेकर आणि राजेश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रमुख पाहुणे राजश्री गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय परिसर व शालेय जीवनात अभ्यासक्रमासोबतच आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्न करणे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पाहून त्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले. डॉ. अनिल काकड यांनी पालकांनी आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त कसे लक्ष द्यावे याबद्दल माहिती दिली.
नगराध्यक्षा सोनाली गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी शाळेबद्दल थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दिलखेचक लोकनृत्य, कोळीनृत्य तसेच जुन्या व नवीन गीतांवर नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
संस्थेचे संचालक शंकरराव महाडिक, अध्यक्षा मंगलाताई महाडिक यांनी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री वेल्हाळ व निकीता मोहिते यांनी केले तर गाण्यांचे सूत्रसंचालन श्रावणी महाडिक या विद्यार्र्थिंनीने केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *