श्री क्षेत्रपाल पूई मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम, १७ वर्ष सार्वजनिक श्री गणेश उत्सव अविरतपणे साजरा

Pui ganesh
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पुई श्री क्षेत्रापाल मित्र मंडळ पुई या मंडळाची स्थापना 2008 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनंत रामू सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करत सामाजिक उपक्रमाचा व्रत सुरू केले. गावात युवकांना एकत्रित करून विविध उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आणि गावात सार्वजनिक श्री गणेश उत्सव म्हणून 2009 मध्ये मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा उपक्रम सुरू करण्यात आला आणि
गणेश उत्सव काळात मंडळाच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,कला,क्रीडा, पर्यावरण असे विविध उपक्रम राबविण्यासाठी युवकांना संधी उपलब्ध करुन दिली.  सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे तसेच त्यांना विविध विषयांवर आदिवक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असे उपक्रम संपन्न झाले आहेत. 
यावेळी मंडळाच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असून देशासाठी देश रक्षणासाठी अहोरात्र देश सेवा केली अशा रोहा तालुक्यातील शूरवीर सेवा निवृत सैनिक व वीर पत्नी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.भरतशेठ गोगवले यांच्या शुभहस्ते गणेश उत्सव निमित्ताने उद्या शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
यानिमित्ताने मंडळाच्या वतीने आकर्षक देखावे, मोठमोठ्या मूर्ती या भाविकांना कायम आकर्षित करीत असतात.येथील साकारण्यात येत असलेली सजावट आणि विलोभनीय मूर्ती मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेते.त्यामुळे या दरम्यान या मंडळाचा सार्वजनिक श्री गणेश उत्सव आणि विविध उपक्रम यांना सामाजिक,शैक्षणिक, प्रशासकीय, पोलिस अधिकारी, राजकीय सह विविध मान्यवर येऊन सदिच्छा भेट देऊन मंडळाला शुभेच्छा देत गणपती बाप्पाचे दर्शन मोठ्या उत्साहात घेतात.
भजन स्पर्धा,लकी ड्रॉ, हळदी कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, जेष्ठ नागरिक सत्कार सोहळा, विद्यार्थ्या दप्तर पुस्तके वाटप इयत्ता पहिली पासून 11 वी ते 15 वी पर्यंत मंगळागौर नाच मंडळ पुई -शाहीर पांढरीनाथ साळवी,तळाघर नाच मंडळ कार्यक्रम, महिला नाच मंडळ कार्यक्रम, पुई महिला नृत्य स्पर्धा, फनी गेम्स, सत्यनारायण पूजा, वह्या वाटप व इंग्लिश पुस्तके वाटप,असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम तरुण युवकांना तसेच ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ यांना आकर्षित करणारे उपक्रम राबविले आहेत तर यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून या मंडळाच्या वतीने मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते माजी सैनिक व विरपत्नी कृतज्ञता सोहळा म्हणून त्यांचा गौरव सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गणपती बाप्पाचे आगमनानंतर गावात सर्विकडे एक धार्मिक तथा आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे तसेच गेली दहा दिवस विविध प्रकारचे उपक्रम सुरू असून हा आगळा वेगळा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सागर सानप,अध्यक्ष विठ्ठल पवार ,उपाध्यक्ष सचिन लहाने, सचिव हरिश्चंद्र कदम, खजिनदार मंगेश सानप, उत्सव समितीचे अध्यक्ष दिनकर सानप सह मंडळाचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *