रायगड जिल्ह्यातील समस्त श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज सेवा मंडळ रायगड जिल्हा अंतर्गत (छिपा )शिंपी समाज बंधूंनी समाधी संजीवन सोहळामंगळवार 22 जुलै 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील पोयनाड , अलिबाग, रोहा , नागोठणे, कोलाड , उरण , कोपरखैरणे, ,माणगाव गोरेगाव, पेण, पनवेल , कळंबोली , खारघर , बेलापूर , लोणावळा, आदी विभागातून जवळ जवळ तीनशे हून अधिक शिंपी समाजातील मान्यवर आपल्या परिवार सोबत उपस्थित होते . आपल्या परिवारातील देवाज्ञा झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.
श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून त्यानंतर श्रीफळ चढवून , दीपप्रज्वलन , पुष्पहार, तुलसी अर्पण व महाआरती करून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये लहान मुलांचे मनोरंजन रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, लकी ड्रॉ, आदीचे कार्यक्रम पार पडले तर आपल्या परिवारातील शैक्षिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बक्षीस पारितोषिक, सन्मान पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध गायक, मिमिक्री श्री. शंकर जी राजस्थान यांच्या सुमधुर आवाजाने सर्वांना हर्षित केले संत शिरोमणी सेवा मंडळाचे स्वस्थापक श्री सूरजमळजी परीहार, कोषाध्यक्ष श्री भवर परिहार, अध्यक्ष सचिन परिहार , उपाध्यक्ष श्री आमृत परिहार, सचिव गिरीश परिहारिया उरण , आदींनी परिश्रम घेतले