सर्व मंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥ अशा प्रकारचे वर्णन देवी पार्वतीचे पुराणानुसार केले आहे.
श्रावण अमावस्येतील मातृदेवता म्हणजे पिठोरी यावर्षी सोमवार १ सप्टेबर 2024 रोजी स्थापना करण्यात आली आहे. हि देवता जलदेवता, निसर्ग देवता, वनदेवा म्हणून समजली जाते. हि पिठोरी श्रावण कृष्ण अमावस या दिवशी येते म्हणून श्रावणातील अमावस्येला “पिठोरी” अमावस्या म्हणतात.
आदिवासी बांधव जंगलात, रानावनात राहतात. तिथे त्यांना वाघापासून भीती वाटायची. देवी पार्वतीचं वाहन वाघ. या वाघापासून देवीने त्यांचे संरक्षण करावे म्हणून आदिवासी बांधव तेरड्याची फूले, नदीकिनारीवरील लव्हाळा व नागवेलीचे फूल यांची पिगेर मांडून तिला पुजू लागले. तेरडे हे तांबडे गुलाबी, लाल, निळे, जांभळे पांढरे या रंगाचे असतात. ते रानात, पाणवठ्यावर गावकुसाबर उगवतात. लव्हाळा म्हणजेच पिगरीचा भाऊ त्याला पिठोरीचा मुल्हारी असे म्हटले जाते.
पिठोरीचा सण हा खऱ्या अर्थाने महिलांचा सण असतो. महिला पिगेरीच्या पाया पडल्यावर म्हातारी आजी तिला “सेस” देते. सेस म्हणजे तेरख्याचा पान व फूल आणि तांदळाचे दाणे. हे तांदळाच्या टाकीत तसेच पूर्वी गुरांच्या गोठ्यात टाकायला सांगे हेतू एवढाच शेती व गुरेढोरे यांची भरभराट व्हावी. पिठोरीचा प्रसाद म्हणजेच जेवण घेतल्यावर पारंपारीक नाच, खेळ, पुराड्या उखाणे रंगतात. भजन होते. रात्री १२ वाजता पिठोरीची आरती होते. त्यानंतर तेरडे म्हणजेच पिगरी सुपात घेवून महिला तो सूप डोक्यावन घेतात. भगिनी पारंपारीक गाणे म्हणतात. जशी निसर्गातून हि पिठोरी तेरड्याच्या उपाने निर्माण झाली ती पाण्यातून त्याच जलात हि निसर्ग देवता, वनदेवता ओहळात, नदीत, तळ्यात विसर्जित करतात आणि पुढल्या वर्षापर्यंत मातृदेवतेची वाट पहातात.