शिवसेना पुरस्कृत दहीहंडी फोडण्याचा मानकरी ठरला आई जोगेश्वरी गोविंदा पथक

Dahihandi Nagothane

नागोठणे ( महेंद्र माने ) :

नागोठणे नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किशोरशेठ जैन मित्रमंडळ व शिवसेना – युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित भव्य दहिहंडी महोत्सव-2024 स्पर्धेत शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, सरपंच सुप्रिया महाडिक, सहा.पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, माजी सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघांना रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, युवासेना नेते कार्तिक जैन,ग्रा.पं.सदस्य- ज्ञानेश्वर साळुंखे व ॲड.प्रकाश कांबळे, शाखाप्रमुख धनंजय जगताप, उपशाखा प्रमुख बाळु रटाटे, महिला शहर संघटीका प्रणिता पत्की, उत्सव कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांच्यासह प्रणव रावकर, तुकाराम खांडेकर,शैलेश रावकर, राजीव टेमकर,ओमप्रकाश मोदी,हभप विजय शहासने, इम्रान पानसरे,दिपक पाटील,भरत गिजे, सुहेल पानसरे समीर भिकन,प्रसाद जोगत,दिपांशु मोदी, प्रकाश मेस्त्री, कैलास गोरे तसेच मंडळाचे पदाधिकारी – सदस्य,शिवसेना युवासेना पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवर व हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दुपारपासून चाललेल्या या महोत्सवमध्ये साधारण 15 गोविंदा पथकांनी भाग घेऊन 05 थर लावून सलामी दिली. या सर्व पथकांस प्रत्येकी रु. 2,501/- व चषक देऊन गौरविण्यात आले.तसेच सात थर लावणार्‍या चौडेश्वरी गोविंदा पथक,वरवठणे, जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी तसेच आई जोगेश्वरी गोविंदा पथक, नागोठणे या विजयी गोविंदा पथकास रोख रु.41,001/- विभागुन देण्यात आले असून दही हंडी फोडण्याचा मान आई जोगेश्वरी गोविंदा पथक, नागोठणे या पथकास देण्यात आला.
या पथकाने सलग दुसर्‍यांदा हंडी फोडण्याचा मान घेतला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी आगरी कोळी गायक गोरख गुंजाळ आणि महेंद्र फोंडे व एव्ही डान्स स्टुडिओ यांचा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष पंकज कामथे, सचिव राकेश चितळकर, खजिनदार अनिल महाडिक, सहसचिव अविनाश भोसले,सहखजिदार नागेश सुर्वे, मुकेश भोय, संजय पाटील,अंकुश जैन,रूपेश जगताप,संतोष घोसाळकर, ऋत्विज माने, सुरेश कांबळे, रूपेश नागोठणेकर,शेखर जोगत,आकाश वाघमारे, महेंद्र नागोठणेकर,यश रावकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *