शासकीय आश्रम शाळा भालिवडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

शासकीय आश्रम शाळा भालिवडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !
कर्जत-ग्रामीण (मोतीराम पादीर)
कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय आश्रम कन्या शाळेत यंदाही ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ९ वाजता लेझीम पथकाच्या तालावर रॅली काढण्यात आली. अनेक विद्यार्थिनी आदिवासी वेशभूषेत सजून आल्या होत्या. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल केवारी (MBBS), शासकीय रुग्णालय कळंब, यांचा सत्कार मुख्याध्यापक मोहन पडघन यांच्या हस्ते शाल-बुके व पेन देऊन करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य, गीत आणि आपल्या बोली भाषेत मनोगत सादर केले. डॉ. केवारी यांनी विद्यार्थिनींना जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम या गुणांच्या मदतीने जीवनात यश संपादन करण्याचा सल्ला दिला. शाळेतील शिक्षक किरवे, कुऱ्हाडे, ढोले, पूजा सराई (नर्स) तसेच कर्मचारी अनंता पादीर, शेवंता वाघमारे यांचाही सत्कार झाला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मोहन पडघन यांनी पालकांना मुलींचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू देऊ नका, १२ वी नंतरही उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या, विवाहाच्या बंधनात अडकवू नका, असा सल्ला दिला. पालक व विद्यार्थिनींच्या सहभागामुळे आदिवासी दिन उत्साहात साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *