शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी सूचित केल्यावर एसटीपी कडून क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यास सुरुवात !

Matheran Block
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :  
माथेरानमध्ये मलनिसारन प्रकल्प (एसटीपी प्लांट) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात असून मुख्य रस्त्यावर खुदाई करून पाईप जोडण्या केलेल्या आहेत. हे खोदकाम करताना मुख्य रस्त्यावरील ब्लॉक्स काढण्यात आले होते. काही दिवसांवर दिवाळी हंगाम येऊन ठेपलेला असताना या मातीच्या धुळीपासून पर्यटकांना तसेच व्यापारी वर्गाला काही त्रास होऊ नये. व्यापारी वर्गाच्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी एसटीपी ठेकेदारांना सूचना करून लवकरच हे काढण्यात आलेले ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत असे सांगितल्यावरून एसटीपी च्या कामाने गती घेतली आहे.
धूळ विरहित रस्त्यांना एकमेव पर्याय म्हणून सनियंत्रण समितीच्या परवानगीने क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. यामुळेच धुळीचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पावसाळ्यात मातीची धूप याच माध्यमातून थांबली असल्यामुळे या रस्त्यावरून चालताना एक वेगळाच आनंद पर्यटकांना तसेच स्थानिकांना मिळत आहे. सध्यातरी ही कामे युद्धपातळीवर सुरू असून कामात काही त्रुटी निदर्शनास आल्यास येथील स्वयंघोषित इंजिनियर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत यामुळे कामे सुस्थितीत होण्यास ठेकेदाराला मदत होत आहे. जवळपास पन्नास कोटी रुपयांची ही कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी स्वतः जातीने लक्ष देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *