वेलनेस फोरेवर मधून चुकीची गोळी दिल्याची रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार, महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mahad Medicale
महाड ( मिलिंद माने ) : मेडिकल दुकानांची चेन मालिका असलेल्या महाड मधील वेलनेस फॉरेवर या मेडिकल दुकानातून चुकीची गोळी दिल्यामुळे वडिलांना त्रास झाल्याची तक्रार रुग्णाच्या मुलाने महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे, मात्र आमच्याकडून कोणत्याच प्रकारची चुकीची गोळी दिली नसल्याची प्रतिक्रिया वेलनेस फॉरेवरच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील रोहिदास नगर भागात राहणाऱ्या सुरेश कांबळे यांनी वेलनेस फोरेवर मध्ये संपलेल्या गोळ्यांचे पाकीट घेऊन गेले असता त्यांना देण्यात आलेल्या गोळी मुळे त्रास झाला. त्यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी गोळीचे नाव बदलून दिले आणि उपचार सुरू ठेवले. याबाबत त्यांचा मुलगा स्वप्निल सुरेश कांबळे याने पुन्हा वेलनेस फॉरेवर मध्ये जाऊन जाब विचारला मात्र वेलनेस फॉरेवर मधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले यामुळे त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेल्या त्रासाबद्दल आणि दिलेल्या चुकीच्या गोळीबाबद्दल तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कडून आमच्याकडे सदर प्रकरण चौकशीला आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. तर वेलनेस फोरेवर चे महाड मधील भरत मेहता यांनी रुग्णाने प्रेस्क्रीप्शन न आणता फक्त गोळीची स्ट्रीप आणली होती, त्या स्ट्रीप नुसार योग्य गोळी दिल्याचे सांगून तक्रार धुडकावून लावली.
याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 276 नुसार समा रोहन मेहता आणि यश जैन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाड तालुक्यातील व शहरातील अनेक मेडिकल दुकानांमध्ये ज्याच्या नावावर मेडिकल शॉप चे लायसन्स आहे अशी व्यक्ती मेडिकल चालवत नसून ज्याला काहीही या मेडिकल बद्दल माहिती नाही अशा अनेक व्यक्ती मेडिकल शॉप चालवत आहेत मात्र अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे अनेक ग्राहकांकडून ऐकण्यास मिळत आहे.
अण्णा औषध प्रशासनाच्या नियमानुसार मेडिकल दुकानांमध्ये वैद्यकीय उपचारांच्या साठी लागणाऱ्या गोळ्या औषधे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू विक्रीसाठी ठेवू नये असा नियम असताना अनेक मेडिकल स्टोअरमध्ये अंडी ब्रेड चॉकलेट वेगवेगळ्या कंपन्यांचे थंड पेय तसेच ग्रामीण भागातील अनेक मेडिकल दुकानांमध्ये किराणा मालातील अनेक वस्तू मग त्या अंड्यापासून ब्रेड पासून ते साखर देखील विक्रीला ठेवली जाते तर काही मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम पार्लरचा देखील धंदा या मेडिकल स्टोर वाल्यांनी उघडलेला आहे वारंवार अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करून देखील अन्न औषध प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीत केवळ कारवाईच नाटक पार पाडत असल्याने अनेक मेडिकल स्टोअर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
अण्णा औषध प्रशासनाच्या नियमानुसार मेडिकल स्टोअर ह्या वातानुकूलित असणे गरजेचे आहे मात्र अनेक मेडिकल स्टोअर मध्ये वातानुकूलित यंत्रणा नसल्याने वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या औषध उपचारांवर त्याचा परिणाम होत असून अनेक औषधे धुळीच्या साम्राज्यात पडल्याची पाहण्यास मिळत आहे याबाबत अन्न व औषध प्रशासन आता नेमकी कोणती कारवाई करते असा प्रश्न अनेक ग्राहक विचारत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *