वीजेच्या लंपडावाने नागोठणे परिसरातील जनता हैराण; महावितरण विरोधात संताप

Mseb
सुकेळी ( दिनेश ठमके ) :
अद्याप पावसाने पाहीजेत तशी सुरूवात केली नसतानासुद्धा सततच्या वारंवार होणाऱ्या वीजेच्या लंपडावामुळे नागोठणेसह वाकण, सुकेळी, बाळसई परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. जुलै महिना सुरु झाला तरी सुद्धा वातावरणात उष्णता ही वाढतच असल्यामुळे पंखे, वातानुकुलीत यंत्राचा वापर वाढलेला असतांनाच वीज अनेक वेळा नसल्याने उकाड्यामुळे नागरीकांचा जीव कासावीस होत आहे. वीज कधी येणार यासंबंधीत अनेक वेळा फोन करुन सुद्धा महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नाहीत तर कधी कधी फोन नाॅट रिचेबल येत असल्यामुळे महावितरणच्या या गळथान कारभाराबाबत परिसरातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामीण व शहरी भागात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेतही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ग्रामीण व शहरी भाग अंधारात बुडून जात आहे.
वीजेचा वारंवार लंपडाव सुरू असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर याचा मोठा फटका हाॅटेल व्यावसायिकांना देखिल बसत आहे. तसेच ग्रामीण भागातील लघुउद्योजक, विजेवर चालणारे फेब्रिकेशन, पीठगीरणी अशा प्रकारचे व्यवसाय करुन आपली उपजीविका करत असतात. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान वीज बिले भरुन घेण्यासाठी महाविरणाकडुन मोठी तत्परता दाखवली जाते. अशीच तत्परता जर का वीज खंडीत झाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी का दाखवली जात नाही असा प्रश्नही उपस्थित करुन महावितरणचे अभियंता व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास स्पेशल अपयशी ठरल्याची टिकाही विभागातील नागरीकांनकडुन करण्यात येत आहे.
———————————-
मी वाकण या ठिकाणी एक छोटासा हाॅटेलचा व्यवसाय करत असुन सध्या सुरू असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे माझे हाॅटेलमधिल अनेक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मला माझ्या व्यवसायामध्ये बसत आहे.
…दिपक भगत, हाॅटेल व्यावसायिक – वाकण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *