रायगड जिल्ह्यातील खारगाव खुर्द येथील उंबरबाव येथील विहिरीच्या पाण्यात मानसिक आजाराच्या त्रासात सोनाली सुनील साळवी (वय 37वर्षे, राहणार सकलप, तालुका म्हसळा)महीलेचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद सुनील अशोक साळवी ( वय 42 वर्षे) यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हसळा तालुक्यातील सखलप येथील मयत सोनाली सुनील साळवी हीस गेल्या आठ वर्षांपासुन मनोरुग्णाचा आजार असुन तिच्यावर त्याबाबत केईएम हॉस्पिटल मुंबई येथे उपचार चालु होते.
रविवार दिनांक 19 मे 2024रोजी सकाळी दहा वाजता मयत सोनाली सुनील साळवी ही मानसिक आजाराचे त्रासात खारगाव गावचे हददीत उंबरबाव विहीरीजवळ येत असताना तिचा तोल जाउन विहीरीचे पाण्यात पडुन बुडून तिचे नाका तोंडात पाणी जाउन मयत झाली.
याबाबत म्हसळा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.