विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मधील १७ जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजणार! राज्यात पुन्हा महिनाभर आचारसंहिता!

विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं
महाड |  मिलिंद माने 
राज्य विधिमंडळातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या मागील अडीच वर्षापासून रिक्त असणाऱ्या १७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून यामुळे महिनाभर राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील काही काळापासून प्रलंबित होत्या त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणुका मागील अडीच वर्षापासून प्रलंबित होत्या मागील चार महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या सानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून द्यायच्या उमेदवारासाठी मतदान करतात.
राज्य विधिमंडळातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या ७८ असून त्यापैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून येतात यापैकी १७ जागा सध्या रिक्त आहेत त्यामध्ये अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे ,जळगाव ,सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया, रायगड- रत्नागिरी -सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली, परभणी- हिंगोली, अमरावती, धाराशिव -लातूर -बीड, संभाजीनगर -जालना, व नागपूर या जिल्ह्यातील निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या रिक्त आहे
राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मध्ये सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, व शिवसेना शिंदे गट या पक्षाची जिल्हा परिषदेवर पंचायत समिती मोर नगरपरिषदा व नगरपंचायतींवर वर्चस्व आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या जागांसाठी आता या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणाव रस्सीखेच होणार आहे उमेदवार मिळवण्यासाठी आता या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधून दावेदारी केली जाणार आहे.
रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा भाजपा मैदानात उतरणार असून या मतदारसंघातून पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे हे सलग दोन वेळा निवडून गेले आहेत आता ते सत्ताधारी पक्षात असले तरी रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व जास्त असल्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपा ही जागा सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला सोडणार नाही अशी चर्चा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चिली जाऊ लागली आहे. एकंदरीत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवार हा नेहमीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा रायगड जिल्ह्यातील पनवेल मधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातून निवडून द्यायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेना शिंदे गड व भाजपा त्यांच्यामध्ये कलगीतुरा रंगणार आहे यापूर्वी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यायच्या जागेसाठी पूर्वाश्रमेचे शिवसेनेतून विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आमदार रवींद्र फाटक यांना देखील या जागेसाठी आता मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठा करावी लागणार आहे कारण ठाणे व पालघर जिल्ह्यात पूर्वीपेक्षा भाजपाचे वर्चस्व जास्त असल्याने भाजपा ही जागा देखील आपल्याकडे खेचून आणण्यासाठी मोठ्या तयारीला लागली आहे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा शहकांच्या राजकारण कोकण व ठाणे पालघर जिल्ह्यात पाहण्यास मिळणार आहे.