पनवेल : खारघर येथील वाहन चालक म्हणुन काम करणारे निलाप्पा बसप्पा बिरादार (40) हा बेपत्ता झाल्याची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घरातून काहीही न सांगता मुर्बी गावातील पाटील चाळीत राहणार निलाप्पा बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नी महादेवी निलाप्पा बिरादार यांनी दिली आहे.
निळ्या रंगाचा शर्ट ,काळ्या रंगाची फुल पेंट, केस काळे रंग सावळा, बांधा मध्यम, उंची 5.6 इंच, डोळे काळे, चेहरा उभट असा एकंदरीत निलाप्पा यांचे वर्णन आहे.
बेपत्ता निलाप्पा यांच्याबाबत माहिती मिळाल्यास नवी मुंबई नियंत्रण कक्ष अथवा खारघर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार एस मोरे यांनी केले आहे.