वर्षासहलीसाठी पर्यटकांना माथेरानचे आकर्षण

Matheran Paryatak
माथेरान ( मुकुंद रांजणे ) : 
मान्सून मध्ये सुट्ट्यांच्या हंगामात दुरदुरुन पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असतात. या सुट्ट्यांच्या हंगामी मोसमात पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याने शनिवारी आणि रविवार या दिवशी  वेळप्रसंगी गावातील साधे घरगुती लॉज सुध्दा मिळणे कठीण होते त्यामुळेच अनेक पर्यटक सोमवार ते गुरुवार या दिवसांत येऊन आपली माथेरानची हौस पूर्ण करताना दिसतात.
सुट्ट्यांच्या हंगामात हॉटेल्स आणि लोजिंगचे दर गगनाला भिडलेले असतात. मध्यमवर्गीय पर्यटकांना हे दर परवडण्यासारखे नसल्याने अशी मंडळी पावसाळी पर्यटनाचे वेध लागल्याने आठवड्यातील सोमवार ते गुरुवार ह्या मधल्या दिवसात सुध्दा मोठया प्रमाणावर माथेरानमध्ये दाखल होताना दिसतात. आपल्या बाळ गोपालांसह रिमझिम  पावसात चिंब भिजण्याचा अन हे पावसाचे गार गार  अंगावर रोमांच उभे करणारे टपोरे थेंब झेलत पायी चालत चालत विविध पॉईंट्स ची सैर करून उंच उंच डोंगरावरून समोरील नयनरम्य देखावे न्याहाळत असतात.  जून महिन्यापासून आजपर्यंत १९५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
——————————————————
अनेकदा आम्ही याठिकाणी आलो आहोत परंतु इथे पावसाळ्यात फिरण्याची जी काही मजा असते ती काही औरच असते. शनिवार यादिवशी आम्हाला कोणत्याही हॉटेल किंवा लॉजचे आरक्षण मिळाले नाही त्यामुळे गुरुवारी सहकुटुंब येऊन अगदी कमी खर्चात लॉज मध्ये मुक्काम केला आहे.
…मेघनाथ बरवे, पर्यटक मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *