महाड भोर वरंध घाटामध्ये एसटी बस पलटी होऊन 15 ते 20 प्रवासी जखमी झाले.
शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास भोर वरंध घाटामधील मोठ्या वळणावर एसटी महामंडळाची बस पलटी झाली. यामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महाड डेपोची रामदास पठार महाड एसटी बस रामदास पठार येथून महाडच्या दिशेकडे येताना अपघात घडला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करून महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन, महाशक्ती ॲम्बुलन्स दाखल झाले. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.