वटपौर्णिमेला वृक्षारोपण करून निसर्ग जतन करण्याचा दिला संदेश, रोहा प्रेस क्लबचा गेली अकरा वर्षे उपक्रम

Roha Press Club
कोलाड  :
वट पौर्णिमेच्या पूजेसाठी झाडांच्या फांद्या न तोडता पूजापाठा सोबतच निसर्गाचे, झाडांचे जतन व्हावे या हेतूने रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे वटपौर्णिमेला वृक्षारोपण करून निसर्ग जतन करण्याचा संदेश दिला जात आहे. शुक्रवारी वट पौर्णिमेच्या दिनी उदडवणे पुला जवळ वृक्षारोपण करून झाडांचे संवर्धन करा, निसर्ग जपू या, निसर्ग फुलवू या.. असा संदेश प्रेस क्लब तर्फे देण्यात आला आहे.
निसर्गाची प्रामुख्याने वडाची पूजा करण्याचा वट पौर्णिमेचा दिवस असतो, रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून दरवर्षीचा वट पौर्णिमे निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम ही एक आगळी वेगळी परंपरा बनली आहे, रोहा प्रेस क्लब मागील अकरा वर्षापासून वट पौर्णिमेचे औचित्य साधून, निसर्गाचे महत्व ओळखून वृक्षारोपनाचा सामाजिक उपक्रम राबवित आहे, या उपक्रमातून झाडांचे मुख्यतः वडाचे महत्व कळावे, झाडांच्या फांद्या न तोडता पूजापाठ समवेत झाडांचे जतन व्हावे, निसर्ग जतनासाठी वृक्षारोपण करण्यात यावे हा संदेश देण्याचा रोहा प्रेस क्लब सदस्यांचा प्रयत्न आहे.
वृक्षारोपणाची ही संकल्पना अविरत राबविण्यासाठी रोहा प्रेस क्लब कुटुंबातील महिला वर्ग आग्रही राहिल्याचे सांगण्यात आले. मागील काळात भुवनेश्वर, तळाघर, निवी, रोहा कोलाड मुख्य रस्ता, चिल्हे, धाटाव स्मशानभूमी आदी ठिकाणी वट पौर्णिमेच्या दिनी वृक्षारोपण करण्यात अल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख आणि प्रेस क्लबचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली.
राजेंद्र जाधव यांच्यासह रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पालदाड पूल रस्ता येथे दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले, वट पौर्णिमेदिनी वृक्षरोपण करा, झाडांचे संवर्धन करा, निसर्ग जपू या, निसर्ग फुलवू या, असा संदेश या वृक्षारोपणाने देण्यात आला. यावेळी रोहा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, उपाध्यक्ष उद्धव आव्हाड, सेक्रेटरी विश्वजित लूमण, खजिनदार संदीप सरफळे, सह खजिनदार अंजुम शेटे, निलम सावंत, नेत्रा मोरे, समिधा अष्टीवकर, शार्दूल मोरे, अमोल मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *