लोकसभेच्या तोंडावर प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य ग्रामस्थांचा शिंदे गटाला जय महाराष्ट्र !

Poladpur Shivasena
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपूर, खडपी आणि गांजवणे येथील शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याच्या बातमीने पोलादपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रवेश कर्त्यांमध्ये दामोदर महाडिक, विजय मोरे, ज्ञानेश्वर पवार, बळीराम सिनकर, तुळशीराम पवार, कोंडीराम जाधव, विलास उतेकर, लक्ष्मण पवार, बाबुराव पवार, सीताराम जगदाळे, दिलीप जगदाळे, सौरभ पवार, गणेश जगदाळे, गजेंद्र चव्हाण, ज्ञानेश महाडिक, उत्तम जगदाळे, अविनाश जगदाळे, निलेश चव्हाण या प्रमुख कार्यकर्तेसह असंख्य ग्रामस्थांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, जिल्हा सहसमन्वयक सुरेंद्र चव्हाण, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, महाड तालुका प्रमुख आशिषदादा फळसकर, जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, महाड तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख, उपतालुका प्रमुख प्रविण महाडिक, पोलादपूर शहरप्रमुख निलेश सुतार, कोंढवी विभाग प्रमुख मंगेश मोरे, पोलादपूर शहर युवासेना प्रमुख अमर नगरकर, नाना चोरगे, काशिनाथ जगदाळे, गणेश शिंदे, विजय शिंदे,माजी सरपंच शिवदास जगदाळे, महादेव शिंदे व विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी कोंढवी विभागातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या असून हनुमंत जगताप व प्रमुखांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील देवपूर, खडपी व गांजवणे भागातील राजकीय कार्यकर्ते प्रवाही असून या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात जोरदार खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *