माथेरान ( मुकुंद रांजाणे ) : पनवेल येथील लेडीज स्पेशल ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू समारंभ जल्लोषात पार पडला. या समारंभात सुमारे 60 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. नृत्य, गायन, उखाणे तसेच इतर कार्यक्रमांमुळे समारंभास रंगत आली. या ग्रुपच्या संस्थापिका शशी देसाई (दीदी) यांच्या हस्ते समारंभाला सुरुवात करण्यात आली. के.व्ही. कन्या शाळेमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्सहात पार पडला.
8 वर्षापूर्वी या ग्रुपची स्थापना झाली असून या लेडीज स्पेशल ग्रुपमध्ये विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांचा समावेश असून वेगवेगळ्या विचारसरणीच्या महिलांना एकत्र आणण्याचे श्रेय सर्वांच्या लाडक्या दिदी शशी देसाई यांनी केले आहे. प्रत्येक संकटाच्यावेळी या ग्रुपमधील महिलांचा हिरिरीने सहभाग असतो. कोरोनामुळे दोन वर्षे सार्वजनिक कार्यक्रम झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
महिलांनी पारंपारिक उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. वेगवेगळ्या स्पर्धांतून जिंकलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. आगामी काळात महिलांना खर्या अर्थाने आर्थिक सक्षम करण्यासाठी तसेच गरजूंना मदत करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्नशील असणार आहे असे जमलेल्या महिलांचे मत आहे.
नगरसेविका सुरेखा मोहोकर, वैजंता तांबोळी, प्रज्ञा जाधव , हेमा गोतमारे, यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढली. तसेच एकपात्री अर्चना रसाळ, व गायन शमा ठाकूर,भारती मोहिते ह्यांनी मान मोहून महिलांचा उत्साह वाढवला वयाचे बंधन न ठेवता आपली आवड जोपासून आयुष्य स्वच्छंदी कसे जगावे? याचा प्रत्यय यावेळी सर्वांना आला.
कार्यक्रमाचे संयोजन शशी देसाई (दिदी), नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी उत्कृष्टरित्या केले. यावेळी इतर महिलांनीही खूप सहकार्य केले.व यापुढील असेच कार्यक्रम होणार असे या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून स्पष्टपणे दिसून आले.