Raigad : लाडकी बहीण योजनेत 22 हजार महिलांचे ई-केवायसी प्रलंबित; 31 मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

रायगड |
 लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 63 हजार 782 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणांस्तव ती प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे आढळून आले आहे.  सध्या 22 हजार 375 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे.
याकरिता लाभार्थी महिलांना तात्काळ https://ladakibahin.maharashtra.gov.in, या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दि.31 मार्च 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.
तालुकानिहाय प्रलंबित ई-केवायसी प्रकरणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग- 2 हजार 633, कर्जत-1 हजार 962, खालापूर- 1 हजार 772, महाड- 1 हजार 656, माणगाव- 1 हजार 799, म्हसळा-808, मुरुड-713, पनवेल-5 हजार 140, पेण-1 हजार 533, पोलादपूर- 427, रोहा-844, श्रीवर्धन- 787, सुधागड-पाली-489, उरण-1 हजार 376, तळा-436.
 महाराष्ट्र शासनाची “लाडकी बहीण” योजना सन 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण, स्वावलंबन वाढविणे व कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश  आहे.  
तसेच ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद होऊ शकतो, याची लाभार्थींनी नोंद घ्यावी.