रोहा चिल्हे येथे 22 दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भावपुर्ण निरोप

Ganesh Visarjan

कोलाड ( श्याम लोखंडे ) :

रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे शनिवारी बाप्पांच्या आगमना पासून गावात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.  तेथील 22 दिवसांच्या बाप्पांना ढोल, ताशांच्या व खालू बाजा आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय म्हणत येथील लहान थोर मंडळी भक्तगणांनी अवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी करत सर्वाना सुखी ठेव म्हणत भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
गणपती विसर्जनासाठी आठ दहा दिवसांपूर्वीच येथिल ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणरायांचे आगमन होणार असल्याने गावातील व विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विशेष वीसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली होती. गणपती उत्सव प्रथमदिनी लहान थोर ग्रामस्थ नागरीक माता भगिनींनी भजन, नाच गाण्यांचा आनंद लुटला रविवारी सायंकाळी वाजत गाजत, काहीतर गुलाल उधळत, टाळ मॄदुंग, ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती.

Ganesh Visarjan

एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नजिकच्या तलाव ठिकाणी निघाले होते.तसेच बाप्पा विसर्जनस्थळी कोलाड विभागातील रेस्क्यूटीम एस व्ही आर एस एस यांच्या वतीने सर्व निर्माल्य एकत्रित संकलित करून ते विशेष ठिकाणी संकलित करण्याची पाठविण्यात आले असे छान उपक्रम या टीम च्या माध्यमातून केल्याने त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून आले.
भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय असे गजर करीत तलावात भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले तद्नंतर गड्यांनो हळू हळू चला, वाचे गजानंद बोला असे भजन गात पुन्हा घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *