पनवेल रेल्वे स्टेशन चौकीसमोरील सर्कल या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 65 ते 70 वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे साडेपाच फुट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले, दाढी बारीक वाढलेली व मिशी वाढलेली असून कपाळ मोठे, नाक सरळ, डाव्या डोक्याच्या वरील बाजूस जुनी जखमेची खुण आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक सुषमा पाटील यांच्याशी संपर्क साधावा.