रेल्वे पटरीवर आढळला महिलेचा मृतदेह !

Body Mahila
पनवेल ( संजय कदम ) :
पनवेल जवळील काळुंद्रे गाव जवळ रेल्वे पटरी पोल क्र. ६९/२७ येथे एका अनोळखी महिलेचा आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर मयत महिला वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष असून रंग सावळा, उंची अंदाजे साडेपाच फुट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे व वाढलेले, कपाल रुंद, नाक दबलेले चपटे, डाव्या हाता काचेचे दोन हिरव्या बांगड्या, अंगात मोरपंखी रंगाची साडी व लाल रंगाचे ब्लाऊज घातलेले आहे.
सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे (९८२३०४७१६१) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *