रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन

Lok Adalat
अलिबाग : 
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दिनांक १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री. अमोल अ. शिंदे यांनी सांगितले.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपुर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांचेकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.
 दिनांक १० मे २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि सदर लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन ए.एस. राजंदेकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *